मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर धोनीचा फोकस फक्त आयपीएल आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामात आणि संघाची कामगिरी खराब झाली. आता या वर्षी धोनी काय कमाल करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. वाचा- आजपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज पहिली लढत उद्या म्हणजे १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईत खेळणार आहे. धोनी गेल्या दोन वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहे. अशात ही धोनीची अखेरची आयपीएल असेल का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वाचा- वाचा- यासंदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी त्याचे मत व्यक्त केले. हे पाहा, मला वाटत नाही की हे त्याचे अखेरचे आयपीएल असेल. हे माझे वैयक्तीक मत आहे. आम्ही धोनीच्या पुढे आणखी कोणाकडे पाहत नाही. वाचा- मॅच गेल्या वर्षी चेन्नईची कामगिरी खराब झाली होती. त्यानंतर धोनीने खेळाडूंना काही सूचना केल्या का यावर काशी म्हणाले, नाही. गेल्या वर्षी काही महत्त्वाचे खेळाडू संघात नव्हते. दोघाना करोना झाला होता. या गोष्टी आमच्या हातात नव्हत्या. आता संघ चांगल्या स्थितीत आहे. खेळाडू १५-२० दिवस झाले सराव करत आहेत. आम्हाला आमच्या प्रक्रियेवर विश्वास आहे. वाचा- धोनी २००८ पासून चेन्नई संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने ३ वेळा विजेतेपद मिळवले होते. धोनीने १९७ पैकी १९९ सामन्यात विजय मिळवला आहे. त्याने चेन्नईला विक्रमी ८ वेळा फायनलमध्ये पोहोचवले आहे. पण २०२० चा हंगाम त्यांच्यासाठी सर्वात खराब ठरला. ते प्रथमच प्लेऑफमध्ये पोहोचू शकले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32dj8RT
No comments:
Post a Comment