मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज सातवी लढत राजस्थान रॉयल्स आणि यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. या लढतीकडे दोन विकेटकिपर कर्णधारांची लढत असे म्हणून देखील पाहिले जात आहे. दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंत तर राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसन याच्याकडे आहे. वाचा- या सामन्याची तयारी दोन्ही संघातील खेळाडू जोरदार करत आहेत. दिल्ली संघाने पहिल्याच लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. तर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जने दिलेले २२३ धावांचे लक्ष्य जवळ जवळ गाठले होते. त्याचा फक्त ४ धावांनी पराभव झाला. या दोन्ही संघात चुरशीची लढत होईल असे मानले जातय. वाचा- अशात दिल्लीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या सामन्याआधी पृथ्वी चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली संघाच्या सराव सामन्यात पृथ्वीने जोरदार फलंदाजी केली. त्यामुळे आज राजस्थानविरुद्ध देखील तो अशीच आक्रमक फलंदाजी करताना दिसू शकतो. वाचा- वाचा- पृथ्वीने आयपीएल २०२१ची धमाकेदार सुरूवा केली आहे. चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ३८ चेंडूत ७२ धावा केल्या होत्या. पृथ्वीच्या आक्रमकतेपुढे चेन्नईच्या गोलंदाजांना काहीच करता आले नाही. पृथ्वीच्या या कामगिरीवर दिल्लीचे कोच रिकी पॉन्टिंग जाम खुश आहेत. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पृथ्वीला १३ सामन्यात फक्त २२८ धावा करता आल्या होत्या. त्याची सरासरी १७.५ इतकी होती. आयपीएल २०२०नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्या एडिलेड कसोटीत खराब कामगिरी केल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर पृथ्वीने देशांतर्गत विजय हजारे स्पर्धेत तुफान फलंदाजी केली आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3adiqZa
No comments:
Post a Comment