मुंबई : आयपीएलच्या लिलावात तब्बल १४ कोटी रुपये मोजत झाय रिचर्डसनला आपल्या संघात दाखल करून घेतले होते. त्यामुळे पंजाब किंग्सच्या संघाडून आजच्या सामन्यात त्याला संधी देण्यात येणार आहे. रिचर्डसनबरोबरच शाहरुख खान आणि रिले मेरीडेथ यांनाही पदार्पणाची संधी दिली आहे. त्याचबरोबर राजस्थानच्या संघात यावेळी मिस्ताफिझूर रेहमान आणि शिवम दुबे हे आपाल पहिला सामना खेळताना दिसतील. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने या वर्षातील लिलावात संघात दाखल केले होते. यासाठी त्यांनी १६.२५ कोटी इतकी रक्कम मोजली होती. गेल्या वर्षी ख्रिस रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळला होता. आता तो राजस्थानकडून खेळताना दिसेल. पंजाब संघाने ऑस्ट्रेलियाच्या झाय रिचडर्सनला १४ कोटींची बोली लावून विकत घेतले. आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या या दोन खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. हे दोन्ही खेळाडू जलद गोलंदाजी करतात. ख्रिस मॉरिस चांगली फलंदाजी देखील करू शकतो. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील पंजाब संघाची धुरा केएल राहुलकडे आहे. तर राजस्थान संघाने संजू सॅमसन याच्याकडे नेतृत्व दिले आहे. आयपीएल २०२०मध्ये खराब कामगिरीनंतर राजस्थान संघाने कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिलीझ केले होते. राहुलचा विचार करता संजूकडे कर्णधारपदाचा फार अनुभव नाही. याचा फायदा पंजाबचा संघ या सामन्यात घेऊ शकतो. दोन्ही संघ पहिल्याच सामन्यात सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करतील. पंजाब संघाने या वर्षी त्यांच्या नावात देखील बदल केला आहे. सलामीवीर म्हणून कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल हे फलंदाज दिसतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QcSiq6
No comments:
Post a Comment