Ads

Sunday, April 11, 2021

IPL 2021 : हरभजन सिंगला केकेआरने पहिल्याच सामन्यात दिले स्थान, पाहा कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी

चेन्नई : कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने पहिल्याच सामन्यात हरभजन सिंगला संघात स्थान दिले आहे. हरभजन गेल्यावर्षी चेन्नई सुपर किंग्सच्या संघात होता. त्यानंतर यावर्षी लिलावात केकेआरच्या संघाने हरभजनला आपल्या संघात स्थान दिले होते. आजच्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हरभजनला यावेळी हैदराबादच्या संघाने संधी दिली आहे. पण केकेआरच्या संघाने यावेळी सुनील नारायणला मात्र वगळल्याचे पाहायला मिळाले. केकेआरच्या संघात यावेळी शुभमन गिला, नितीष राणा, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शाकिब अल हसन, हरभजन सिंग, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिध कृष्णा यांना संधी देण्यात आली आहे. हैदराबादच्या संघात यावेळी वृद्धिमान साहाचे पुनरागमन झालेले पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये साहाला दुखापत झाली होती. पण यावेळी मात्र हैदराबादच्या संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. हैदराबादच्या संघआचे नेतृत्व यावेळी डेव्हिड वॉर्नरकडे आहे. त्याचबरोबर मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, विजय शंकर, मोहम्मद नबी, अब्दुल समद, रशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि टी. नटराजन यांना यावेळी संघात स्थान देण्यात आले आहे. हैदराबादचे नेतृत्व वॉर्नर तर कोलकाताचे नेतृत्व मॉर्गन करतो. गेल्या वर्षी स्पर्धेच्या मध्येच दिनेश कार्तिककडून मॉर्गनकडे नेतृत्व देण्यात आले होते. त्यामुळे मॉर्गनकडे करण्यासारखे फार काही नव्हते. पण या वर्षी पहिल्या सामन्यापासून त्याच्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे. इंग्लंड संघाला त्याने ज्या पद्धतीने अव्वल स्थानी पोहोचवले होते, अशीच अपेक्षा कोलकाता संघाला आहे. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात हैदराबादने कोलकाताला नेट रनरेटच्या आधारे मागे टाकत प्ले ऑफमध्ये जागा मिळवली होती. आता या हंगामात दोन्ही संघ पहिली लढत एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. या लढतीत कोलकाता विजय मिळून गेल्या वर्षात प्ले ऑफमध्ये स्थान न मिळाल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. तर हैदराबादचा प्रयत्न स्पर्धेची सुरूवात विजयाने करण्याचा असेल. कोलकाताला गेल्या वर्षी ऑलराउंडर खेळाडूंची कमतरता जाणावली होती. वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेलला धावा करता आल्या नाहीत आणि तो गोलंदाजीत फार प्रभाव टाकू शकला नाही. रसेलवर अवलंबून राहिल्याने कोलकाताला मोठा फटका बसला. आता या हंगामात त्यांनी शाकिब अल हसनचा समावेश केला आहे. त्यामुळे संघ मजबूत झाल्याचे दिसेत. हैदराबादकडून ही जबाबदारी विजय शंकरवर असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ajSjQr

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...