मुंबई: मध्ये काल सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ४ धावांनी पराभव झाला. या सामन्यात राजस्थानकडून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू खेळत होता. अखेरच्या षटकात जेव्हा राजस्थानला विजय जवळ जवळ दिसत होता तेव्हा मॉरिस मैदानावर होता. वाचा- पंजाबविरुद्धच्या सामन्यात १६.२५ कोटी रुपये मोजलेल्या या खेळाडूला काही खास कामगिरी करता आली नाही. पंजाबने दिलेल्या २२२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर १९ षटकात २०९ धावा केल्या होत्या. अखेरच्या सहा षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. वाचा- तेव्हा संजू आणि ख्रिस मॉरिस मैदानावर होते. संजूने ५८ चेंडूत ११२ धावा तर मॉरिसने ३ चेंडूत एक धाव केली होती. पहिल्या चेंडूवर धाव निघाली नाही. दुसऱ्या चेंडूवर सॅमसनने एक रन काढली. तिसऱ्या चेंडूवर मॉरिसने एक धाव काढली. त्यानंतर सॅमसनने चौथ्या चेंडूवर षटकार मारला. आता दोन चेंडूत पाच धावा हव्या होत्या. पाचव्या चेंडूवर संजूने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशने शॉट मारला. मॉरिस धावत संजू जवळ पोहोचला होता. पण संजूने त्याला पुन्हा माघारी पाठवले. वाचा- आयपीएलमधील सर्वात महाग अशा खेळाडूला संजूने माघारी पाठवले. या प्रकारानंतर ख्रिस मॉरिस प्रचंड नाराज झाला. त्याच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर देखील चर्चा सुरू आहे. वाचा- मॉरिसने तोपर्यंत ४ चेंडूत फक्त दोन धावा केल्या होत्या आणि संजू चांगली फलंदाजी करत होता. त्यामुळेच तो त्याच्या ठिकाणी योग्य होता असे मत अनेकांनी व्यक्त केले. वाचा- सामन्यात अखेरच्या चेंडूवर संजूने हवेत शॉट मारला पण तो थेट फिल्डरच्या हातात गेला आणि राजस्थानचा ४ धावांनी पराभव झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mK4omB
No comments:
Post a Comment