चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील सहावी लढत आणि यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत स्पर्धेत एक मॅच खेळील आहे. त्यापैकी बेंगळुरूने विजय तर हैदराबादचा पराभव झालाय. विराटच्या RCBने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. तर कोलकाता नाइट रायडर्सने हैदराबादवर विजय मिळवला होता. वाचा- या दोन्ही संघात आयपीएलमध्ये आतापर्यंत १८ लढती झाल्या आहेत. यापैकी १० लढतीत हैदराबादने विजय मिळवला असून ७ लढतीत आरसीबीने विजय मिळवला. एका लढतीचा निकाल लागला नाही. गेल्या पाच सामन्याचा विचार केल्यास हैदराबादने ३ तर बेंगळुरूने दोन मध्ये विजय मिळवला आहे. वाचा- गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० मध्ये हैदराबाद आणि बेंगळुरू या दोन्ही संघात तीन लढती झाल्या होत्या. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले होते. पहिल्या साखळी लढतीत आरसीबीने तर त्यानंतरच्या दुसऱ्या साखळी आणि प्लेऑफमधील लढतीत हैदराबादने विजय मिळवला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uQ6HHG
No comments:
Post a Comment