चेन्नई : यावर्षीच्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का बसला आहे. आरसीबीच्या संघाने यावेळी दमदार कामगिरी करत विजयी सलामी दिली. मुंबई इंडियन्सने आरसीबीपुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा लीलया पाठलाग करत आरसीबीने विजय साकारत दोन गुणांची कमाई केली. पहिल्याच चेंडूवर आरसीबीचा सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरला यावेळी रोहित शर्माने झेल सोडत जीवदान दिले. पण त्यानंतर सुंदर आणि कर्णधार विराट कोहली यांनी यावेळी ३६ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर कृणाल पंड्याने सुंदरला बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला. सुंदरला यावेळी जीवदान मिळनूही १० धावांवर समाधान मानावे लागले. सुंदर बाद झाल्यावर विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावगती चांगलीच वाढवली. यावेळी विराटला संघात नव्याने दाखल झालेल्या ग्लेन मॅक्सवेलची चांगली साथ मिळाली. मॅक्सवेल आणि कोहली यांनी यावेळी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही रचली. पण त्यानंतर काहीच वेळात विराट कोहलीला जसप्रीत बुमराने बाद करत मुंबई इंडियन्सला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या खेळणाऱ्या मार्को जॅन्सनने ग्लेन मॅक्सवेलला बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. त्याच षटकात जॅन्सनने शाहबाझ अहमदला बाद करत आरसीबीला दुहेरी धक्के दिले. तत्पूर्वी, मुंबईची सुरुवात संयत झाली असली तरी यावेळी रोहित शर्मालाच या आयपीएलमधील पहिला चौकार आणि पहिला षटकारही फटकावण्याचा मान मिळाला आहे. रोहितने यावेळी तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पहिला चौकार लगावल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यावेळी गोलंदाजी करत होता. त्याच्या या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पहिला चौकार पाहायला मिळाला. या सामन्यातील पहिला षटकारही रोहित शर्मानेच लागवला. आरसीबीचा फिरकीपटू युजवेंद्र चचहलच्या चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्माने यावेळी धमाकेदार षटकार लगावला. त्यामुळे या आयपीएलमध्ये पहिला चौकार आणि षटकार फटकावण्याचा मान यावेळी रोहित शर्माला मिळाला. पण रोहितला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. कारण ख्रिस लीनबरोबर फलंदाजी करत असताना रोहित शर्मा हा धावचीत झाला आणि मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. रोहितला यावेळी १९ धावा करता आल्या. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव फलंदाजी आला. त्यानंतर सूर्यकुमार आणि ख्रिस लीन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला धावांचा चांगला पाया रचून दिला. पण आरसीबीचा वेगवान गोलंदाज जेमिसनने यावेळी सूर्यकुमारला बाद केले आणि मुंबईला दुसरा धक्का दिला. सूर्यकुमारला यावेळी २३ चेंडूंत ३४ धावा करता आल्या. सूर्यकुमार बाद झाल्यावर काही वेळातच लीनही बाद झाला आणि त्याचे अर्धशतक यावेळी एका धावेने हुकले. लीनने यावेळी चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४९ धावांची खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2POTtw4
No comments:
Post a Comment