चेन्नई : मुंबई इंडियन्सच्या संघात केकेआरविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. या सामन्यासाठी संघ निवडताना मुंबई इंडियन्सच्या संघाला एका प्रश्नाने चांगलेच सतावले होते. मुंबई इंडियन्सच्या संघाने या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना दिले आहे. दुसऱ्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात ख्रिस लीनला वगळून क्विंटन डीकॉकला संधी देण्यात आली आहे. डीकॉक पहिल्या सामन्यात खेळला नव्हता आणि त्यावेळी लीनने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला वगळण्याची जोखीम मुंबई इंडियन्सचा संघ घेणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. कारण एका संघात फक्त चार विदेशी खेळाडू खेळू शकतात. संघात कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट यांचे स्थान तर जळपास निश्चित समजले जात आहे. त्यामुळे जर डीकॉक आणि लीन या दोघांनाही खेळवायचे असेल तर त्यांना मार्को जॅन्सनला संघातून बाहेर काढावे लागू शकते. पण त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीचा एक पर्याय कमी होऊ शकतो. त्यामुळे मार्कोला संघातून काढणे हे त्यांना परवडणारे नसेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने हा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेची पाकिस्तानबरोबर मालिका सुरु होती आणि डीकॉक हा तिथे खेळत होता. त्यानंतर तो भारतात दाखल झाला होता. त्यानंतर डीकॉक क्वारंटाइन झाला होता आणि त्यामुळेच ख्रिस लीनला संधी देण्यात आली होती. पण आता डीकॉकचा क्वारंटाइनचा कालावधी संपलेला आहे आणि तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघात हा एक मोठा बदल झालेला पाहायला मिळू शकेल. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न रोहित शर्माला सोडवावा लागणार होता आणि त्याने हा प्रश्न सोडवला आहे. मुंबई इंडियन्सने यावेळी थेट क्विंटन डीकॉकला संघात स्थान दिले आहे. आज अर्जुन तेंडुलकर, धवल कुलकर्णी, आदित्य तरे आणि हार्दिक पंड्या यांनी आपल्या चाहत्यांना खास मराठीमध्ये गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच पसंतीस पडला आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल तर कोलकाताची नजर दुसरा विजय मिळून गुणतक्तात अव्वल स्थानी झेप घेण्याची असेल. या दोन्ही संघातील आतापर्यंतची कामगिरी पाहता मुंबई इंडियन्स अधिक मजबूत दिसतो. या दोन्ही संघात गेल्या १२ लढतीत कोलकाताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. आयपीएलच्या सुरुवातीपासून दोन्ही संघात २७ लढती झाल्या असून त्यात मुंबईने २१ सामन्यात विजय मिळवला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/327T1LW
No comments:
Post a Comment