चेन्नई: () हा किती शानदार फलंदाज आहे हे तो सातत्याने सिद्ध करून दाखवत आहे. आयपीएलमध्ये काल (१३ एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या फलंदाजीमुळे मुंबईला २० षटकात १५२ धावा तरी करता आल्या. सूर्यकुमार वगळता ()ने ४३ धावा केल्या. मुंबईच्या अन्य कोणत्याही फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. वाचा- झेप गोलंदाजीत मुंबईकडून राहुल चहरने ४ षटकात २७ धावा देत चार विकेट घेतल्या. तर अखेरच्या दोन षटकात जसप्रीत बुमराह आणि ट्रेंड बोल्ट यांनी शानदार गोलंदाजी केली आणि १२ चेंडूत १९ धावांचे संरक्षण केले. वाचा- या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह ५६ धावा केल्या. सूर्यकुमारने मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्या क्रमांकावर येत सात वेळा ५० हून अधिक धावा केल्या. याबात त्याने रोहित शर्माचा विक्रम मागे टाकला. रोहितने मुंबईकडून तिसऱ्या क्रमांकावर सहा वेळा ५० हून अधिक धावा केल्या. या यादीत अंबाती रायडू अव्वल स्थानी आहे. त्याने मुंबईकडून तिसऱ्या क्रमांकावर आठ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्या क्रमांकावर सर्वधिक वेळा ५० हून अधिक धावा करणारे फलंदाज अंबाती रायडू- ८ वेळा सूर्यकुमार यादव- ७ वेळा रोहित शर्मा- ६ वेळा मुंबईविरुद्धच्या सामन्यात १५व्या षटकापर्यंत कोलकाताला विजय मिळेल असे वाटत होते. पण त्यानंतर गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आणि अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RzRUmg
No comments:
Post a Comment