चेन्नई : मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर अनपेक्षित विजय साकारला. पण मुंबई इंडियन्सकडून दोन्ही सामन्यांमध्ये काही सारख्याच मोठ्या चुका झाल्याचे पाहायला मिळाले. या चुकांचा मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्या सामन्यात बसला होता. पण दुसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी झाल्यामुळे मुंबई इंडियन्सला या चुकांचा फटका बसला नाही. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या तीन फलंदाजांपैकी दोघांनी दोन्ही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव ख्रिस लीन आणि दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी चांगली फलंदाजी केली. पण या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीला जास्त धावा करता आल्या नाहीत. दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सची मधली फळी अपयशी ठरली आहे आणि याच चुकीचा फटका मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यातही बसला होता. पहिल्या सामन्यात मुंबईचा संघ ३ बाद १०५ अशा सुस्थितीत होता. त्यानंतर मुंबईची मधली फळी गडगडली आणि मुंबईला ९ बाद १५९ अशी धावसंख्या उभारता आली. या गोष्टीचा अर्थ असा की, मुंबईने आपले सहा फलंदाज फक्त ५४ धावांमध्ये गमावले. त्यामुळेच मुंबईला पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळेच आरसीबीने हा सामना जिंकला आणि मुंबईसा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा १५.२ षटकांमध्ये जेव्हा बाद झाला तेव्हा मुंबई इंडियन्सची ४ बाद ११५ अशी स्थिती होती. त्यानंतर जवळपास पाच षटके मुंबई इंडियन्सकडे शिल्लक होती. यावेळी २८ चेंडूंमध्ये मुंबई इंडियन्सला फक्त ३७ धावा करता आल्या, पण त्यासाठी या संघाला तब्बल सहा फलंदजा गमवावे लागले. मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी १५२ धावांमध्ये ऑलआऊट झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या हे फलंदाजीमध्ये अपयशी ठरले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये या चौघानांही चांगली फलंदाजी करता आलेली नाही आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. त्यामुळे ही चुक मुंबई इंडियन्सचा संघ कधी सुधारणार, याची अपेक्षा चाहत्यांना नक्की असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uVqDJv
No comments:
Post a Comment