चेन्नई: आयपीएल २०२१च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर १० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने २० षटकात १८७ धावा केल्या. उत्तरादाखल हैदराबादला १७७ धावा करता आल्या. वाचा- प्रथम फलंदाजाला आलेल्या कोलकाताची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर शुभमन गिल १५ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर आणि राहुल त्रिपाठी यांनी शानदार फलंदाजी केली. यात राणाने ५६ चेंडूत ८० धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिल्या चेंडूवर त्याने चौकार मारला होता. त्यानंतर शानदार अर्धशतक देखील केले. ५० धावा पूर्ण झाल्यानंतर राणाने एक अनोखा इशारा केला आणि अर्धशतक झाल्याचा आनंद साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- राणाने ज्या पद्धतीने इशारा केला तशा पद्धतीचा इशारा जर्मनीचा फुटबॉलपटू मेसुट ओजिल हा देखील करतो. ओजिल गोल केल्यानंतर नेहमी एका विशिष्टपद्धतीने इशारा करून आनंद साजरा करतो. अर्धशतक झाल्यानंतर राणाने बॅटीने सर्वांना अभिवादन केले आणि त्यानंतर बोटातील अंगठी सर्वांना दाखवली. आयपीएल सुरू होण्याआधी राणाला करोना झाला होता. करोनावर मात करून पहिल्याच सामन्यात त्याने शानदार कामगिरी केली. या खेळीनंतर त्याने पत्नी साचीला अंगठी दाखवली. नितिश आणि साची यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये विवाह केला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uM9TnB
No comments:
Post a Comment