मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात झाली. स्पर्धेत आतापर्यंत फक्त तीन लढती झाल्या आहेत. पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्सवर, दुसऱ्या लढतीत (Delhi Capitals) ने चेन्नई सुपर किंग्जवर तर काल झालेल्या तिसऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. या पहिल्या तीन लढतीनंतर गुणतक्त्यात कोणता संघ कुठल्या स्थानावर आहे ते जाणून घेऊयात... स्पर्धेतील फक्त तीन सामने झाले आहेत. यातील तीन विजयी संघात अव्वल स्थानी आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ. दिल्ली, कोलकाता आणि बेंगळुरू यांचे गुण समान असेल तरी दिल्लीने नेट रनरेटच्या आधारावर आघाडी घेतली. दिल्लीने चेन्नईवर ७ विकेट आणि ८ चेंडू राखून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचे रनरेट सर्वाधिक म्हणजे प्लस ०.७७९ इतके आहे. तर हैदराबादवर १० विकेटनी विजय मिळवणाऱ्या कोलकाताचे रनरेट प्लस ०.५०० इतके आहे. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबईवर विजय मिळवणाऱ्या बेंगळुरूचे रनरेट प्लस ०.०५० इतके आहे. त्यांनी अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला होता. पराभूत संघांमध्ये सर्वात तळाला म्हणजेच आठव्या स्थानावर आहे तो चेन्नई सुपर किंग्ज(Chennai Super Kings)चा संघ, त्यांचे नेट रनरेट वजा ०.७७९ इतके आहे. सातव्या क्रमांकावर हैदराबाद असून त्याचे रनरेट वजा ०.५०० इतके आहे. तर वजा ०.०५० रनरेटसह मुंबईचा संघ सहाव्या स्थानावर आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन ८५ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. तर पर्पल कॅप म्हणजेच सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बेंगळुरूचा हर्षल पटेल अव्वल स्थानावर आहे, त्याने पहिल्याच सामन्यात मुंबईविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eamEC7
No comments:
Post a Comment