चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात काल बुधवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा ६ धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबादला सहज विजय मिळवता आला असता. पण मधळ्या फळीतील फलंदाजांनी खराब कामगिरी केली त्याचा फटका त्यांना बसला. वाचा- बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत २० षटकात १४९ धावा केल्या होत्या. विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ३७ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५४ धावा केल्या. वाचा- वॉर्नरच्या या अर्धशतकी खेळीत आयपीएलमधील एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. बेंगळुरू विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वॉर्नरने स्वत:च्या नावावर केला. याआधी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने आयसीबीविरुद्ध आतापर्यंत ८५४ धावा केल्या आहेत. ज्या कोणत्याही संघाविरुद्ध एका खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा होत्या. आता हा विक्रम वॉर्नरच्या नावावर झाला आहे. वाचा- डेव्हिड वॉर्नरने आरसीबीविरुद्ध आता ८७७ धावा केल्या आहेत. या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ७५५ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्मा ७१६ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. वाचा- आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ५३ वेळा अशी कामगिरी केली असून या यादीत ४२ अर्धशतकासह शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहलीने ४४ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mM3ciT
No comments:
Post a Comment