Ads

Thursday, April 15, 2021

IPL 2021 RR vs DC Match Preview and Update: राजस्थान विरुद्ध दिल्ली, युवा कर्णधारांमध्ये चुरशीची लढत

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज चुरशीची लढत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज (१५ एप्रिल) आणि यांच्यात मॅच होणार आहे. दिल्ली संघाने नवा कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. तर राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जविरुद्ध निसटता पराभव झाला होता. वाचा- पंजाबविरुद्धच्या सामन्यात २२३ धावांचे लक्ष्य जवळ जवळ राजस्थानने गाठले होते. आज होणाऱ्या दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी राजस्थानला एक मोठा झटका बसला आहे. संघातील ऑलराउंडर बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेत बाहेर झालाय. असे असेल तरी पहिल्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनच्या शतकी खेळीने राजस्थानला नक्की प्रेरणा मिळाली असेल. वाचा- दिल्ली कॅपिटल्सने पंतच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२१ची शानदार सुरुवात केली आहे. चेन्नईचा सात विकेटनी पराभव केल्याने दिल्लीचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. दिल्ली संघात दक्षिण आफ्रिकेचे कागिसो रबाडा आणि एनरिच नॉर्त्जे हे दोन खेळाडू दाखल झाले आहेत. यातील नॉर्त्जेचा करोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो संघात खेळू शकणार नाही. पण या दोघांशिवाय दिल्लीने फलंदाजीला अनुकुल असलेल्या मैदानात २००पेक्षा कमी धावसंख्येत रोखले होते. वाचा- राजस्थानची सर्वात मोठी डोकेदुखी पहिल्या सामन्यात राजस्थानचे गोलंदाज अजिबात लयमध्ये दिसले नाहीत. पदार्पणाच्या सामन्यात ३१ धावा देत तीन विकेट घेणारा चेतन सकारिया वगळता अन्य एकाही गोलंदाजाला पंजाबच्या फलंदाजांना रोखता आले नाही. मुस्तफिजुर रहमान, ख्रिस मॉरिस, स्टोक्स, श्रेयस गोपाल आणि राहुल तेवतिया यांनी भरपूर धावा दिल्या. या सर्वांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. वाचा- दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी बेन स्टोक्स संघातून बाहेर झाल्याने त्याच्या जागी कोणाला स्थान द्यायचे हा मोठा प्रश्न संजू सॅमसन समोर असणार आहे. स्टोक्सच्या जागी लियम लिव्हिग्स्टोन संघात परतू शकतो. जोस बटलर, शिवम दुबे आणि रियान पराग यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल. वाचा- आतापर्यंत झालेल्या २२ लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी ११ लढती जिंकल्या आहेत. या लढतीत दोन युवा विकेटकिपर आणि कर्णधार यांच्या नेतृत्व गुणाची परीक्षा होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Q8sFa9

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...