चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात काल बुधवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू()ने सनरायझर्स हैदराबाद()वर ६ धावांनी विजय मिळवला. या हंगामात सलग दोन सामन्यात विजय मिळवणारा आरसीबी हा पहिला संघ आहे. या विजयासह त्यांनी गुणतक्त्यात चार गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. वाचा- प्रथम फलंदाजी करत मॅक्सवेलच्या ५९ धावांच्या जोरावर बेंगळुरूने १४९ धावा केल्या. उत्तरादाखल हैदराबादला १४३ धावा करता आल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नर मैदानात होता तोपर्यंत हैदराबाद जिंकेल असे वाटत होते. पण त्यानंतर त्यांनी विकेट गमावल्या आणि सामना देखील. वाचा- गुणतक्त्यात चार गुणांसह आरसीबीने अव्वल स्थान गाठले आहे. त्यांचे नेट रनरेट प्लस ०.१७५ इतके आहे. दिल्लीचा संघ एका विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. आज राजस्थानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवल्यास ते पुन्हा अव्वल स्थानी पोहोचू शकतात. वाचा- मुंबई इंडियन्स तिसऱ्या, पंजाब किंग्ज चौथ्या, कोलकाता पाचव्या, राजस्थान रॉयल्स सहाव्या, तर दोन पैकी दोन लढतीत पराभव झालेला सातव्या स्थानावर आहे. सर्वात तळाला चेन्नई सुपर किंग्ज आहे. त्यांनी एकच सामना खेळला आणि तो गमावला असला तरी त्यांचे नेट रनरेट सर्वात कमी वजा ०.७७९ इतका आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये नितिश राणा अव्वल स्थानी आहे. त्याने २ सामन्यात १३७ धावा केल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत हर्षल पटेलने पुन्हा अव्वल स्थान मिळवले. त्याने २ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gp2Z47
No comments:
Post a Comment