चेन्नई: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने एक आठवडा क्वारटाइनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तो बुधवारी संघा सोबत सराव सत्रात सहभागी झाला. ची पहिली लढत उद्या ९ एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई इंडिन्स संघाविरुद्ध होणार आहे. या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार अशी लढत पाहायला मिळणार आहे. वाचा- मुंबई विरुद्ध होणाऱ्या पहिल्या लढतीआधी विराटने संघातील खेळाडूंना चक दे स्टाइलने कानमंत्र दिला. विराटने सराव सत्रात मेहनत आणि वेळेचा योग्य उपयोग करण्याचे महत्त्व सांगितले. आरसीबीचे पूर्ण व्यवस्थापन तुमच्या पाठिशी असल्याचे तो म्हणाला. वाचा- RCB या वर्षी आयपीएलमध्ये काही खास करण्यासाठी उतरणार आहे. या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. यंदा त्यांनी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याचा संघात समावेश केला आहे. त्याच बरोबर न्यूझीलंडचा जलद गोलंदाज कायल जेमिसनला १५ कोटींना विकत घेतले. या दोघांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. वाचा- काय म्हणाला विराट... जे नवे खेळाडू RCBशी जोडले गेले आहेत त्यांचे स्वागत. याआधी प्रमाणे या हंगामात देखील संघाचे वातावरण आणि ऊर्जा शानदार असणार आहे. मला सर्वांकडून हीच आशा आहे की त्यांनी मैदानावर वेळाचा योग्य वापर करावा. अगदी सराव सत्रात देखील. तुम्ही सर्वजण उत्साह दाखवाल. आपण एकत्र खेळतो आणि यात कोणताही बदल होणार नाही. वाचा- ... खेळाडूंना संघ व्यवस्थापनाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि माझ्याकडून देखील. ज्या खेळाडूंची निवड झाली आहे ते आरसीबीच्या संस्कृतीत मोठे योगदान देतील. जर आपण एकत्र आहोत असा विचार केला तर या हंगामात नक्कीच काही तरी खास करू.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dLQo7P
No comments:
Post a Comment