Ads

Tuesday, April 13, 2021

IPL 2021 : मुंबई इंडियन्सने विजयानंतर गुणतालिकेत कितवे स्थान पटकावले, पाहा..

चेन्नई : मुंबई इंडियन्सने यावेळी केकेआरच्या तोंडातील विजयाचा घास हिरावल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सचा संघ १५२ धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यामुळे १५३ धावांचा पाठलाग करताना केकेआरने बिनबाद ७२ अशी दमदार सुरुवात केली होती. पण त्यानंतर केकेआरचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि त्यांना हातातील सामना गमवावा लागला. मुंबई इंडियन्सने अखेरच्या षटकामध्ये केकेआरवर १० धावांनी विजय साकारला. या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. मुंबई इंडियन्सच्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या नितीष राणा आणि शुभमन गिल यांनी दमदार सलामी दिली आणि विजयाचा पाया या दोघांनी यावेळी ७२ धावांची सलामी दिली. त्यानंतर शुभमन गिलला राहुल चहरने बाद केले आणि केकेआरला पहिला धक्का दिला. गिल बाद झाल्यावरही राणा दमदार फलंदाजी करत होता आणि त्याने या स्पर्धेतील आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पण त्याचवेळी राहुल त्रिपाठी आणि कर्णधार इऑन मॉर्गनच्या रुपात केकेआरला दोन धक्के बसले. त्यानंतर राणाच्या रुपात तर केकेआरला मोठा धक्का बसला. राणाने यावेळी ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. राणा बाद झाल्यावर शकिब अल हसनही बाद झाले आणि केकेआरचा डाव अडचणीत आला. मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. कारण या सामन्यात पुनरागमन करणारा क्विंटन डीकॉक बाद झाला, त्याला फक्त दोन धावा करता आल्या. मुंबईसाठी हा पहिला धक्का होता. क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर मुंबईला धक्का बसला असला तरी त्यानंतर सूर्यकुमार यादव चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. कारण सूर्यकुमारने यावेळी रोहितपेक्षा जास्त आक्रमक खेळ केला आणि त्याने मुंबईची धावगती चांगलीच वाढवली. सूर्यकुमारने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक साकारले. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र सूर्यकुमारला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सूर्यकुमारने बाद होण्यापूर्वी सात चौकार आणि दोन षटकारांसह ५६ धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर मुंबईला इशान किशनच्या रुपात लगेचच तिसरा धक्काही बसला. इशानला यावेळी एकच धाव काढता आली. मुंबईला आता एकामागून एक दोन धक्के बसले होते. त्यानंतर रोहित शर्मा संघाचा डाव कसा सावरतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण रोहितला यावेळी मुंबईची धावसंख्या वाढता आली नाही. कारण रोहितला यावेळी ३२ चेंडूंत ४३ धावा करता आल्या. पॅट कमिन्सने यावेळी रोहित शर्माला त्रिफळाचीत केले. रोहित बाद झाल्यावर मुंबईचा डाव कोसळला आणि त्यांच्यावर ऑलआऊट होण्याची वेळ आली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32c4ESg

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...