चेन्नई: आयपीएलमध्ये काल मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय मिळवला. मुंबईने कोलकातासमोर विजयासाठी फक्त १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. पण कोलकाताला ते पार करता आले नाही. मुंबईच्या या विजयाने गुणतक्त्यात मोठा बदल झाला आहे. या सामन्याआधी कोलकाता नाइट रायडर्स दुसऱ्या क्रमांकावर होते ते आता पाचव्या क्रमांकावर गेले आहेत. तर पाचव्या क्रमांकावर असलेला मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सने दोन पैकी एक पराभव आणि एक विजयासह दोन गुण मिळवले आहेत. त्याचे नेट रनरेट प्लस ०.२२५ इतके आहे. तर कोलकाताचे एक विजय आणि एक पराभवासह दोन गुण असून त्याचे नेट रनरेट प्लस ०.००० इतके आहे. गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्स प्लस ०.७७९ रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज तिसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स चौथ्या, राजस्थान रॉयल्स सहाव्या, सनरायझर्स सातव्या तर सर्वात शेवटी चेन्नई सुपर किंग्जचा संघ आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये नितिश राणाने बाजी मारली आहे. त्याने सलग दोन अर्धशतकासह १३७ धावा केल्या आहेत. तर मुंबई विरुद्ध पाच विकेट घेऊन आंद्र रसेलने दोन सामन्यात ६ विकेट घेत अव्वल स्थान मिळवले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mJ9LTn
No comments:
Post a Comment