चेन्नई: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ऑलराउंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे आरसीबीला १४९ पर्यंत पोहोचता आले. गेल्या हंगामात खराब कामगिरी करणाऱ्या मॅक्सवेलवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळेच पंजाब संघाने त्याला रिलीझ देखील केले होते. या वर्षी आरसीबीकडून खेळताना त्याने दोन्ही सामन्यात चांगली फलंदाजी केली. वाचा- हैदराबादविरुद्ध मॅक्सवेलने ४१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावा केल्या. आयपीएलमध्ये २०१६ नंतर मॅक्सवेलने अर्धशतक झळकावले आहे. गेल्या ३ हंगामात त्याला अर्धशतक करता आले नव्हते. वाचा- या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली नाही. दोन विकेट ५०च्या आत पडल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मॅक्सवेलने डाव सावरला. कोहली २९ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. त्यानंतर मधळ्या फळीतील फलंदाज देखील अपयशी ठरले. वाचा- वाचा- या सामन्यात अर्धशतक झळकावल्यामुळे मॅक्सवेलचा आत्मविश्वास वाढला असेल. त्याच बरोबर विराट आणि आरसीबीला देखील मोठा दिलासा मिळाला असेल. मॅक्सवेल फॉर्ममध्ये आल्यास आरसीबीच्या पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e4Blq3
No comments:
Post a Comment