चेन्नई: मध्ये आज होणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत विजयासाठी योग्य संघ निवडेल. या हंगामातील पहिल्या दोन लढतीत पराभव झाल्याने गुणतक्त्यात खाते उघडण्यासाठी त्यांना विजय गरजेचा आहे. वाचा- डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबाद संघाला १५० ही धावसंख्या पार करता आली नव्हती. पहिल्या दोन्ही लढतीत या दोन्ही संघांना लक्ष्याचा पाठलाग करताना अडचणी आल्या होत्या. हैदराबाद संघाकडे फलंदाजीची खोली नाही. त्याच बरोबर त्यांच्याकडे पर्यायी खेळाडू देखील नसल्याने पराभवाला सामोरे जावे लागत आहे. कर्णधार वॉर्नरच्या संघ निवडीवर देखील टीका होत आहे. जॉनी बेयरस्टो आणि वृद्धिमान साहा या दोन विकेटकिपरना संघात स्थान देऊन काहीही फायदा झाला नाही. साहा सलामीवीर म्हणून अजीबात लयमध्ये दिसत नाही. २००८पासून त्याच्या कामगिरीकडे पाहिले तर तो सातत्याने खराब कामगिरी करत आहे. वाचा- डग आउटमध्ये केदार जाधव, प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा सारखे खेळाडू असताना साहाला संघात ठेवल्याने काही फायदा होताना दिसत नाही. जर केदार आणि अभिषेकला संधी मिळाली तर गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. अंतिम ११ मध्ये वॉर्नर आणि राशिद खान या दोनच परदेशी खेळाडूंचे स्थान निश्चित आहे. केन विलियमसनची संघात गरज आहे, पण त्याच्या फिटनेसवर सर्व काही अवलंबून आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नबीला संधी मिळू शकते. वाचा- संघातील मनिष पांडे आणि अब्दुल समद यांनी ज्यापद्धतीने RCB विरुद्ध फलंदाजी केली त्यावरून वॉर्नर नक्की नाराज असेल. गोलंदाजीत टी नटराजन गेल्या हंगामाप्रमाणे फॉर्ममध्ये नाही. भुवनेश्वर कुमार एका सामन्यात महाग ठरला होता. मुंबईची फलंदाजीपाहता हैदराबादकडे फार पर्याय दिसत नाहीत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gjY2cr
No comments:
Post a Comment