
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने (India Cricket Team) आजच्या दिवशी १० वर्षापूर्वी २ एप्रिल २०११ रोजी २८ वर्षानंतर आयसीसी वर्ल्डकप जिंकला होता. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. महेंद्र सिंह धोनी(Mahendra Singh Dhoni)च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुन्हा एकदा कमाल केली होती. वाचा- श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम लढतीत गौतम गंभीरने ९७ धावा केल्या होत्या. तर धोनीने नाबाद ९१ धावा केल्या. ()ने नाबाद २१ धावा आणि दोन विकेट देखील घेतल्या. जहीर खानने दोन विकेट मिळवल्या होत्या. कर्णधार धोनीने षटकार मारत ऐतिहासिक असा विजय मिळून दिला. वाचा- टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत माजी सलामीवीर () म्हणाला, वर्ल्डकप विजयाचे १४ हिरो होते. ज्यांची नावे फार समोर आली नाहीत. यामध्ये मुनाफ पटेल, मी स्वत:, हरभजन सिंग, विराट कोहली ज्याने पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते. सुरेश रैना ज्याने पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाची खेळी साकारली होती. या सर्व खेळाडूंचे योगदान मोठे होते. आज जेव्हा १० वर्षानंतर मी हे पाहतो जेव्हा मालिकावीर पुरस्कार मिळवल्यानंतर देखील युवराज सिंगचे नाव मागे पडले. लोक त्याच्याबद्दल बोलत नाहीत. लोक फक्त त्या एका षटकाराबद्दल बोलतात. पण प्रत्यक्षात या सर्वांचे योगदान होते त्यामुळे भारत वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. वाचा- अंतिम सामन्यात विजयासाठी ११ चेंडूत ४ धावांची गरज असताना धोनीने षटकार मारला. स्पर्धेत युवराज सिंगने ३६२ धावा आणि १५ विकेट घेतल्या होत्या.त्या आधी भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात युवीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. वाचा- वर्ल्डकपमध्ये युवराजने पाचव्या गोलंदाजाची भूमिका पार पाडली होती. युवीबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, माझ्यासाठी दोन्ही वर्ल्डकपमध्ये युवराज हिरो होता. मला वाटत नाही त्याच्या योगदानाशिवाय भारताने २०११ चा वर्ल्डकप जिंकला असता. २००७च्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये युवीने ७५ धावा केल्या होत्या. त्याने जे केले त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sJtioV
No comments:
Post a Comment