चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठी चूक केली. आता या चुकीबद्दल त्याला मॅच रेफ्रींकडून फटकारण्यात आले आहे. वाचा- हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराटने २९ चेंडूत ३३ धावा केल्या. जेसन होल्डरच्या चेंडूवर विजय शंकरने त्याचा कॅच घेतला. बाद झाल्यानंतर मैदानातून बाहेर जाताना रागाच्या भरात विराटने एका जाहिरातीच्या फलकावर बॅट मारली आणि डग आउटमध्ये ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर बॅट मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा- विराटच्या या कृतीची मॅच रेफ्री व्ही.नारायण कुट्टी यांनी गंभीर दखल घेतली आहे. विराटने आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंखन केल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. आचारसंहितेच्या स्तर १ गुन्हा २.२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलय. या नियमात क्रिकेट साधनांशिवाय अन्य साहित्याचे नुकसान करणे अशा गोष्टींचा समावेश होतो. वाचा- वाचा- ... याबाबत आयपीएलने एक निवेदन दिले असून, विराट कोहलीने आचारसंहितेच्या लेव्हर गुन्हा २.२ च्या नियमाचे उल्लंघन केल्याचे कबुल केले आहे. लेव्हर १च्या उल्लंघनासाठी मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे, असे म्हटले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आरसीबीने १४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर हैदराबादला १४३ धावा करता आल्या. विराटच्या संघाने सामना ६ धावांनी जिंकला आणि स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eaFSaK
No comments:
Post a Comment