दुबई: भारतीय संघाचा कर्णधार ( ) सध्या आयपीएलचा १४वा हंगाम खेळत आहे. विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे नेतृत्व करत आहे. आज त्यांची लढत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. या लढती आधी विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक झटका बसला आहे. वाचा- आयसीसीच्या ताज्या वनडे ( ) क्रमवारीत विराट कोहलीने अव्वल स्थान गमावले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार () याने ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या या क्रमवारीत बाबर आझम अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मोठ्या कालावधीपासून विराट कोहली अव्वल स्थानावर होता. वाचा- पाकिस्तानच्या एखाद्या फलंदाजाने वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याची ही २००३नंतरची पहिली घटना आहे. आझमने अव्वल स्थान मिळवल्याने पाकला १८ वर्षानंतर हा मान मिळाला. पाकिस्तानकडून अशी कामगिरी करणारा आझम हा चौथा खेळाडू आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेतील अंतिम सामन्यात ८२ चेंडूत ९४ धावा केल्या होत्या. ज्यामुळे त्याला १३ गुण मिळाली आणि ८६५ गुणांसह तो पहिल्या स्थानवर पोहोचला. विराट कोहली वनडे क्रमवारीत १ हजार २५८ दिवस पहिल्या स्थानावर होता. हा कालावधी जवळ जवळ तीन वर्षापेक्षा अधिक आहे. वाचा- क्रमवारीत आझमचे ८६५ गुण तर विराटचे ८५७ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर भारताचा रोहित शर्मा असून त्याचे ८२५ इतके गुण आहेत. टॉप १० मध्ये भारताचे हे दोनच खेळाडू आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e0d8kI
No comments:
Post a Comment