चेन्नई : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहलीने आरसीबीच्या संघात एक मोठा बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे. या एका बदलामुळे आरसीबीच्या संघाची फलंदाजी अधिक भक्कम होऊ शकते. आरसीबीच्या संघात दुसऱ्या सामन्यासाठी देवदत्त पडीक्कलला स्थान देण्यात आले आहे. पडीक्कलला करोना झाला होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते आणि तो क्वारंटाइनमध्ये होता. पडीक्कल त्यामुळेच पहिला सामना खेळू शकला नव्हता. पण आता पडीक्कल पूर्णपणे फिट झाला असून त्याला हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. या सामन्यासाठी आरसीबीने रजत पाटीदारला डच्चू दिला आहे. हैदराबादच्या संघातही यावेळी दोन बदल केले आहेत. हैदराबादने या सामन्यासाठी संदीप शर्माच्या जागी शाहबाझ नदीमला संघात स्थान दिले आहे. त्याचबरोबर मोहम्मद नबीला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी संघात अष्टपैलू जेसन होल्डरचा समावेश करण्यात आला आहे. आरसीबी आणि हैदराबाद या दोन्ही संघात आयपीएलमध्ये आतापर्यंत १८ लढती झाल्या आहेत. यापैकी १० लढतीत हैदराबादने विजय मिळवला असून ७ लढतीत आरसीबीने विजय मिळवला. एका लढतीचा निकाल लागला नाही. गेल्या पाच सामन्याचा विचार केल्यास हैदराबादने ३ तर बेंगळुरूने दोन मध्ये विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० मध्ये हैदराबाद आणि बेंगळुरू या दोन्ही संघात तीन लढती झाल्या होत्या. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले होते. पहिल्या साखळी लढतीत आरसीबीने तर त्यानंतरच्या दुसऱ्या साखळी आणि प्लेऑफमधील लढतीत हैदराबादने विजय मिळवला होता. या दोन्ही संघांना आतापर्यंत स्पर्धेत एक मॅच खेळील आहे. त्यापैकी बेंगळुरूने विजय तर हैदराबादचा पराभव झालाय. विराटच्या आरसीबीने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. तर कोलकाता नाइट रायडर्सने हैदराबादवर विजय मिळवला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sfCv75
No comments:
Post a Comment