लंडन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला ने २०१०च्या दशकातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सलग दुसऱ्या वर्षी या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. वाचा- कोहलीने ऑगस्ट २००८ साली श्रीलंकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत २५४ सामन्यात १२ हजार १६९ धावा केल्या आहे. wisdenने पहिल्या आंतरराष्ट्रीय वनडे सामन्याला ५० वर्ष झाल्याबद्दल प्रत्येक दशकातील पाच क्रिकेटपटूंची निवड केली आहे. १९७१ ते २०२१ या काळातील प्रत्येक दशकातील एका सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली आहे. २०१०च्या दशकासाठी विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे. विराट २०११च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. त्याने दहा वर्षात ११ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात ४२ शतकांचा समावेश आहे. वाचा- भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला ९०च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. सचिनने १९९८ साली एका वर्षात ९ शतक झळकावली होती. देशाला पहिले वर्ल्डकप जिंकूण देणारे कर्णधार कपिल देव यांना ८०च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. कपिलच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली प्रथम वर्ल्डकप जिंकला होता. त्या दशकात सर्वाधिक विकेट घेणारे आणि सर्वाधिक स्ट्राइक रेट असणाऱ्या कपिल यांनी एक हजारहून अधिक धावा केल्या होत्या. वाचा- इंग्लंडचा ऑलराउंडर खेळाडू बेन स्टोक्सला सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. गेल्या वर्षी त्याने ५८ सामन्यात ६४१ धावा तर १९ विकेट घेतल्या. महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी तर वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डला टी-२० मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PVYmDL
No comments:
Post a Comment