चेन्नई : कोलकाता नाइट राडयर्सने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादवर १० धावांनी विजय साकारला. नितिष राणाच्या ८० धावाच्या जोरावर कोलकाताने हैदराबापुढे १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादला यशस्वीपणे करता आला नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. कोलकाताच्या १८८ धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात फक्त एका धावेवर असताना जीवदान मिळाले होते. पण यााचा फायदा वॉर्नरला उठवता आला नाही. कोलकाताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णनने वॉर्वरला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. वॉर्नरला यावेळी तीन धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सलामीवीर वृद्धिमान साहाही लवकर बाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. हैदराबादने आपले दोन्ही सलामीवीर लवकर गमावले. पण त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी संघाला डाव सारवला. जॉनी आणि पांडे या दोघांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जॉनीने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र जॉनीला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कोलकाताच्या पॅट कमिन्सने यावेळी जॉनीला बाद केले. जॉनीने यावेळी ४० चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. सलामीवीर शुभमन गिलने यावेळी चौकार लगावत कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली. पण गिलपेक्षा राणा यावेळी जास्त आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. गिलला यावेळी मोठी फटकेबाजी करता आली नाही. हैदराबादच्या रशिद खानने यावेळी गिलला त्रिफळाचीत केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. गिलला यावेळी १५ धावांवरच समाधान मानावे लागले. गिल बाद झाल्यावर कोलकाताला धक्का बसला असला तरी राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करणे सोडले नाही. राणाने यावेळी हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. राणाने यावेळी उत्तुंग षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुल त्रिपाठीने यावेळी फक्त २८ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. हे त्रिपाठीचे आयपीएलमधील सहावे अर्धशतक ठरले. पण अर्धशतक झळकावल्यावर त्रिपाठी जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही, कारण टी. नटराजनच्या गोलंदाजीवर त्याचा सुंदर झेल हैदराबादचा यश्टीरक्षक वृद्धिमान साहाने पकडला. त्रिपाठीने यावेळी २९ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. राणाने यावेळी ५६ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांसह ८० धावांची दमदार खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3g2oGqs
No comments:
Post a Comment