मुंबई : पंजाब किंग्सच्या दीपक हुडाने यावेळी पहिल्याच सामन्यात २० चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले. दीपकने अर्धशतक झळकावल्यावर मुंबई इंडियन्सच्या कृणाल पंड्याला सोशल मीडियावर चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. पण हुडा आणि पंड्या यांचे कनेक्शन नेमकं काय आहे, हे चाहत्यांनीच सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. कृणाल आणि दीपक हे दोघेही बडोद्याचे खेळाडू आहे. जानेवारीमध्ये महिन्यामध्ये बडोद्याचा संघ बीसीसीआयची स्पर्धा खेळण्यासाठी एकत्र आला होता. त्यावेळी सर्व संघासमोर आपला अपमान केल्याचे, दीपक हुडाने सर्वांसमोर सांगितले होते. त्यानंतर कृणालवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण बडोद्याच्या क्रिकेट मंडळाने त्यानंतर कृणालवर कारवाई केली नाही, तर दीपक हु़डावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामुळे दीपकचे मोठे नुकसान झाले आणि त्याचा फटका दीपकला बसला. पण दीपकने हे सर्व नुकसान आपल्या एका खेळीनेच भरुन काढल्याचे पाहायला मिळाले. दीपक जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा त्याला चेंडूमध्ये कृणाल पंड्या दिसत होता, त्यामुळेच त्याने आपला राग चेंडूवर काढला, असेही एका चाहत्याने म्हटले आहे. आता जेव्हा मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना होईल, तेव्हा कृणाल आणि दीपक हे दोघे समोरासमोर येतील. त्यावेळी नेमकं काय होतं, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. या सामन्यात दीपक कृणालच्या गोलंदाजीवर कशी फटकेबाजी करतो, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असेल. धडाकेबाज फलंदाजी करत असलेला ख्रिस गेल बाद झाल्यावर राहुल आणि दीपक हुडा यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली. राहुलने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण राहुलपेक्षा यावेळी हुडा जास्त आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. हुडाने यावेळी २० चेंडूंमध्येच आपले अर्धशतक साजरे केले. अर्धशतक पूर्ण करताना हुडाने यावेळी सहा षटकार आणि एक चौकार लगावला. हुडाने यावेळी २८ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ६४ धावांची तुफानी खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PVH6yl
No comments:
Post a Comment