चेन्नई : यावर्षीच्या आयपीएलची झोकात सुरुवात झाली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करत आहे. या आयपीएलमध्ये पहिला चौकार आणि पहिला षटकार फटकावण्याचा मान मुंबई इंडियन्सच्या कोणत्या खेळाडूला मिळाला, पाहा... आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने झोकात सुरुवात केली. यावेळी रोहित शर्मालाच या आयपीएलमधील पहिला चौकार आणि पहिला षटकारही फटकावण्याचा मान मिळाला आहे. रोहितने यावेळी तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पहिला चौकार लगावल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यावेळी गोलंदाजी करत होता. त्याच्या या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पहिला चौकार पाहायला मिळाला. या सामन्यातील पहिला षटकारही रोहित शर्मानेच लागवला. आरसीबीचा फिरकीपटू युजवेंद्र चचहलच्या चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्माने यावेळी धमाकेदार षटकार लगावला. त्यामुळे या आयपीएलमध्ये पहिला चौकार आणि षटकार फटकावण्याचा मान यावेळी रोहित शर्माला मिळाला. पण रोहितला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. कारण ख्रिस लीनबरोबर फलंदाजी करत असताना रोहित शर्मा हा धावचीत झाला आणि मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. आजच्या सामन्यात ख्रिस लीन या स्टार खेळाडूला पदार्पण करण्याची संधी दिली आहे. त्याचबरोबर या संघात मार्को जॅन्सन या दक्षिण आफ्रिकेच्या युवा खेळाडूलाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लीन आणि मार्को आपल्या पहिल्याच सामन्यात कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचीच नजर असेल. गेल्या आठ वर्षांत मुंबई इंडियन्सला पहिला सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे या सलामीच्या लढतीत ते विजय मिळवणार का, हे पाहावे लागेल. मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक ९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई १३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई १७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई २० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई २३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई २९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली १ मे- विरुद्ध CSK- दिल्ली ४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली ८ मे- विरुद्ध RR- दिल्ली १० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू १३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू १६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू २० मे- विरुद्ध RCB- कोलकाता २३ मे- विरुद्ध DC- कोलकाता
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rZBGPH
No comments:
Post a Comment