चेन्नई : आरसीबी आणि सनरायझर्स यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता. पण यामध्ये अखेर बाजी मारली ती आरसीबीच्या संघाने. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीला हैदराबादपुढे १५० धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले. पण वॉर्नर बाद झाला आणि हैदराबादचा डाव गडगडला. आरसीबीने यावेळी ६ धावांनी हैदराबादवर विजय मिळवला. आरसीबीच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. कारण हैदराबादचा सलामीवीर वृद्धिमान साहा यावेळी फक्त एक धाव काढून आऊट झाला. पण त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांची चांगलीच जोडी जमली. वॉर्नर आणि पांडे या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला आणि दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची दमदार भागीदारी रचली. वॉर्नरला बाद करत आरसीबीचा वेगवान गोलंदाज कायले जेम्निन्सनने ही भागीदीरी फोडली. वॉर्नरने यावेळी ३७ चेंडूंत सात चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर ५४ धावांची भागीदारी रचली. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी देवदत्त पडीक्कल हा आपला पहिलाच सामना खेळत होता. पहिल्याच सामन्यात पडीक्कलला ११ धावांवरच समाधान मानावे लागले. पडीक्कल बाद झाल्यावर शाहबाद अहमद फलंदाजीला आला आणि त्याने १४ धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला आला. त्यावेळी कोहली आणि मॅक्सवेल यांच्यामध्ये चांगली भागीदारी होईल, असे वाटत होते. पण त्यावेळी मोक्याच्या क्षणी कोहली बाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. कोहली बाद झाल्यावर काही चेंडूंतच एबी डिव्हिलियर्सही बाद झाला आणि आरसीबीचा संघ अडचणीत सापडला. पण त्यानंतर मॅक्सवेलने अर्धशतक झळकावले आणि आरसीबीला हैदराबादपुढे १५० धावांचे आव्हान ठेवता आले. कोहली आणि डिव्हिलियर्स हे दोघेही महत्वाचे खेळाडू आऊट झाले असले तरी मॅक्सवेलने यावेळी अखेरपर्यंत किल्ली लढवला. मॅक्सवेलने अखेरच्या काही षटकांमध्ये तळाच्या फलंदाजांना साथीला घेतले आणि आरसीबीची धावसंख्या वाढवली. मॅक्सवेलने यावेळी ४१ चेंडूंत ५ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५९ धावांची खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tvOsr3
No comments:
Post a Comment