मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी देशातील ९ मैदानांची निवड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या उच्च स्तरीय काउंसिरच्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेतल्याचे कळते. बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपसाठी ज्या ९ मैदानांची निवड केली आहे, त्यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, धर्मशाळा, अहमदाबाद, लखनऊ या शहरांचा समावेश आहे. टी-२० ची फायनल मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केली जाईल. याआधी भारतात २०१६ साली झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये बीसीसीआयने ७ ठिकाणी सामने भरवले होते. या वेळी ९ ठिकाणी सामने होतील. वाचा- २०१६च्या वर्ल्डकपमध्ये नागपूर आणि मोहालीमध्ये सामने झाले होते. पण यावेळी या दोन मैदानांचा समावेश केला नाही. त्याच्या जागी हैदराबाद आणि अहमदाबाद या मैदानांचा समावेश केला गेलाय. या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये १६ संघ सहभागी होणार आहेत. कोरना व्हायरसमुळे गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकप स्थगित केला गेला होता. तो वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होणार होता. त्यानंतर आयसीसीने वर्ल्डकप भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेतला. सध्या भारतात करोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार असून तोपर्यंत देशातील कोरना स्थितीत सुधारणा होईल अशी आशा आहे. भारतात सध्या आयपीएल स्पर्धा सुरू आहे. सर्व खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. करोनामुळे प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी नाही. परिस्थितीत सुधारणा नाही झाली तर वर्ल्सकप दरम्यान प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळणार नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sskN0g
No comments:
Post a Comment