नवी दिल्ली : बॉलीवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटानीच्या प्रेमात भारताचा एक क्रिकेटपटू पडला आहे. हा क्रिकेटपटू सध्याच्या घडीला इंग्लंडमध्येच आहे आणि त्याला इंग्लंड एन्जॉय करायचे असल्याचे त्याने सांगितले आहे. दिशा पटानी बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला प्रसिद्ध असेलली हॉट अभिनेत्री आहे. यापूर्वी दिशाचे नाव एका युवा राजकारणी नेत्याबरोबरही जोडले गेले होते. त्यानंतर दिशा आणि टायगर श्रॉफ यांच्यामध्ये अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. आता दिशा पटानीबरोबर भारताच्या या क्रिकेटपटूचे नाव समोर आले आहे. याबाबतचा खुलासा या क्रिकेटपटूनेच केला आहे. बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे जुने नाते आहे. आतापर्यंत बऱ्याच बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू यांची लग्न झालेली सर्वांनीच पाहिली आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यामध्ये अफेअर्सच्या जोरदार चर्चाही आतापर्यंत रंगल्या आहेत. त्यामध्ये आता दिशा पटानीचे नावही जोडले गेले आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या या क्रिकेटपटूची एक खास मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये या खेळाडूने सांगितले की, सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करायला मला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर सुट्ट्यांचा आनंद लुटायला इंग्लंड ही जागा मला आवडेल, असेही त्याने सांगितले. त्यानंतर कोणावर तुझं क्रश आहे, असे विचारल्यावर या क्रिकेटपटूने दिशा पटानीच नाव घेतले आहे. त्यामुळे ही गोष्ट आता दिशाला समजल्यावर ती नेमकी काय प्रतिक्रीया देते, हे पाहणे महत्वाचे आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या या खेळाडूचे नाव आहे अरझान नागसवाला. भारतीय संघाबरोबर नेट गोलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तो भारतीय संघाबरोबर इंग्लंडमध्येच आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला मिळणार नाही ही गोष्ट...इंग्लंडविरुद्च्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला आपली चुक सुधारायची होती. त्यासाठी आपल्याला सराव सामना खेळायला मिळाला हवा, अशी मागणी भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही केली होती. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह हे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाशी चर्चा करत होते. सराव सामन्याबाबत बीसीसीायने इंग्लंडबरोबर चर्चा केली. पण इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने या गोष्टाीला नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमध्ये सराव सामना खेळण्याची संधी मिळणार नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2U0Jeqb
No comments:
Post a Comment