साऊदम्पटन : भारतीय संघ फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाला. पण पराभूत झाल्यावरही भारतीय संघांवर पैशांचा वर्षाव झाला आहे. पराभूत झाल्यावरही भारतीय संघाने करोडो रुपयांची कमाई केल्याचे आता समोर आले आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या फायनलकडे लागले होते. त्यामुळे आयसीसीनेही यावेळी दोन्ही संघांवर पैशांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडने फायनल जिंकली आणि त्यांना १६ लाख डॉलर एवढी रक्कम आयसीसीकडून मिळाली आहे. पण दुसरीकडे भारतीय संघही पराभूत होऊन चांगलाच मालामाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय संघ पराभूत झाला असला तरी त्यांची चांगलीच कमाई झाली आहे. भारतीय संघाला पराभूत झाल्यावर ८ लाख डॉलर एवढी रक्कम मिळाली आहे, याचाच अर्थ फायनल गमावल्यावरही भारताला ५.९३ कोटी एवढी मोठी रक्कम मिळाली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताचा संघ या पराभवानंतरही दुसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे कोणते मोठे पराभव झाले याची यादीही आता समोर आली आहे. शास्त्री यांनी जेव्हापासून भारतीय संघाची सूत्रे हातात घेतली तेव्हापासून भारतीय संघ आयसीसीच्या चार महत्वाच्या स्पर्धांमध्ये अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने काही विजय नक्कीच मिळवले. पण आयसीसीच्या महत्वाच्या ज्या चार स्पर्धा झाल्या त्यामध्ये भारतीय संघाला अपयश आल्याचेच पाहायला मिळाले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आतापर्यंत ती़नवेळा आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये उतरला आहे. भारतीय संघ २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दाखल झाला होता. यावेळी भारतासमोर आव्हान होते ते पाकिस्तानचे. भारतीय संघाच्या बैठकीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची, असे ठरले होते. पण कोहलीने मात्र नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.कोहलीच्या या निर्णयाचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आणि त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर २०१९ साली इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळवण्यात आला होता. या विश्वचषकातही कोहली एक कर्णधार म्हणून अपयशी ठरला होता. या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीतच बाहेर पडावे लागले होते. आता काही दिवसांनी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाही होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zSpN3r
No comments:
Post a Comment