नवी दिल्ली: पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा न्यूझीलंडने पराभव केला. साउदम्प्टन येथे झालेल्या फायनल सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला. आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने पहिल्या WTCच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले होते. पण अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. आता दुसऱ्या WTCला सुरुवात होणार असून भारत पुन्हा फायनलमध्ये पोहोचेल का मोठा प्रश्न आहे. या दुसऱ्या सत्रात भारतीय संघ कोणत्या देशांविरुद्ध खेळणार आहे ते जाणून घेऊयात. वाचा- पहिल्या WTC प्रमाणे या वेळी देखील भारतीय संघाला तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका विदेशात खेळायच्या आहेत. याची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेने होईल. विदेशात भारताला इंग्लंड शिवाय दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. तर घरच्या मैदानावर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. WTC-2 घरच्या मैदानावरील मालिका न्यूझीलंडविरुद्ध नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ (२ कसोटी) श्रीलंकाविरुद्ध फेब्रुवारी-मार्च २०२२ (३ कसोटी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोव्हेंबर २०२२ (४ कसोटी) --- WTC-2 विदेशातील मालिका इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ (५ कोसटी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डिसेंबर २०२१-जानेवारी २०२२ (३ कसोटी) बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ (२ कसोटी) वाचा- WTCच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघ १९ कसोटी सामने खेळणार आहे. पहिल्या सत्रात भारताने ७० गुण मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या हिशोबाने भारताला १४ सामन्यात विजय मिळवावा लागेल. विजय कमी झाले तर त्याची भरपाई ड्रॉने होऊ शकते. ड्रॉसाठी निम्मे गुण तर पराभवासाठी एकही गुण मिळत नाही. कसे दिले जातील गुण WTCच्या पहिल्या सत्रात आयसीसीने दोन पेक्षा अधिक कसोटी मालिकेसाठी १२० गुण निश्चित केले होते. याचा अर्थ एका कसोटी मालिकेत चार सामने असतील तर प्रत्येक मॅचला ३० गुण तर दोन सामने असतील तर ६० गुण असतील. पण यावेळी असे असणार नाही. आयसीसीने प्रत्येक मॅचसाठी समान गुण देण्याचे ठरवले आहे. या शिवाय विजयाची टक्केवारी ही गुणतक्ता ठरवण्यासाठी वापरली जाईल. न्यूझीलंडविरुद्ध बदला घेण्याची संधी WTCच्या दुसऱ्या सत्रात भारताला न्यूझीलंडकडून WTCमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. २०१९-२१ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर भारताचा २-० असा पराभव झाला होता. तेव्हा भारताने एकमेव मालिका गमावली होती. आता न्यूझीलंडचा संघ या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gYWHrL
No comments:
Post a Comment