मुंबई: श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक यांनी सांगितले की पुढील काही दिवसात मी इंग्लंडमधील भारतीय संघ व्यवस्थापनाशी त्याच्या गरजेच्या गोष्टींसंदर्भात चर्चा करणार आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. वाचा- मी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दरम्यान त्रास दिला नाही. पण आता पुढील काही आठवड्यात मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि ते काय विचार करत आहेत हे जाणून घेईन, असे द्रविड म्हणाला. वाचा- द्रविडच्या मते श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा मुख्य उद्देश मालिका जिंकण्याचा आहे आणि आशा आहे की या प्रक्रियेत टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने काही पर्याय समोर येतील. संघात असे काही खेळाडू आहेत जे टी-२० वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सध्या तरी संघाचा मुख्य उद्देश मालिका जिंकण्याचा आहे. वाचा- मालिकेत विजय मिळवण्याचा उद्देश आहे. पण मला आशा आहे की, आम्ही निवड समितीसाठी काही चांगले पर्याय देऊ. द्रविडच्या मते श्रीलंका दौरा पृथ्वी शॉ नव्हे तर देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड सारख्या अन्य खेळाडूंसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. वाचा- पृथ्वी शॉ शिवाय अन्य काही खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. पडिक्कल आणि गायकवाड सारखे काही युवा खेळाडू या दौऱ्यात आहेत. हे सर्व जण चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. यांना टी-२० वर्ल्डकपसाठी संघात घ्यायचे की नाही हा निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचा निर्णय असेल. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय संघासोबत चांगली कामगिरी केली तर निवड समिती नक्कीच विचार करेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3x6pLTN
No comments:
Post a Comment