साऊदम्पटन : रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी आक्रमक फलंदाजी केल्यामुळे भारतीय संघाला आता विजयाची आशा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण जर भारताला हा सामना जिंकायचा असेल त्यांना अधिक आक्रमक खेळ करावा लागेल, त्यामुळे न्यूझीलंडपुढे त्यांना चांगले आव्हान ठेवता येऊ शकते. फायनच्या सहाव्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताची ५ बाद १३० अशी स्थिती होती आणि त्यांच्याकडे ९८ धावांची आहे. खेळपट्टीवर आता रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा हे दोघे फलंदाज आहे. लंचपूर्वी या दोघांनी आक्रमक फलंदाजी केली होती. या दोघांनी लंचनंतर २० षटके खेळून काढली आणि त्यामध्ये त्यांनी जर आक्रमक फलंदाजी केली तर भारतीय संघासाठी ते फायद्याचे ठरेल. त्याचबरोबर भारतीय संघाने जर अजून ८०-१०० धावा केल्या आणि न्यूझीलंडपुढे २०० धावांचे आव्हान दिले तर भारतीय संघाला विजयाची संधी मिळू शकते. त्यामुळे दुसऱ्या सत्रात आता भारताकडून कशी फलंदाजी होते, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल. पण दुसऱ्या सत्रात जर भारताच्या २-३ विकेट्स लवकर पडल्या तर त्यांना हा सामना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे दुसऱ्या सत्रात आता पंत, जडेजा आणि अश्विन कशी फलंदाजी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. फायनलचे दुसरे सत्र भारतासाठी महत्वाचे असेल. सहाव्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी २ बाद ६४ वरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. विराट कोहलीने काल ८ धावा केल्या होत्या. या धावसंख्येत त्याने पाच धावांची भर घातली आणि तो बाद झाला. काइल जेमिसनने त्याला बाद केले. पहिल्या डावात देखील काइलने त्याची विकेट घेतली होती. विराटच्या पाठोपाठ चेतेश्वर पुजारा देखील बाद झाला. पुजाराने कालच्या धावसंख्येत २ धावांची भर टाकली आणि काइलच्या चेंडूवर तो बाद झाला. पुजारा बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ७२ अशी झाली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणेही बाद झाला असून भारतीय संघ आता किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यासाठी पंत आणि जडेजा किती आक्रमक फलंदाजी करतात, याची उत्सुकता सर्वांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xJCj3h
No comments:
Post a Comment