नवी दिल्ली : भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला आता गंभीर दुखापत झाली आहे. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची असून त्याला इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण दौऱ्याला मुकावे लागेल. हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असेल. पण जर गिल संपूर्ण दौऱ्यात खेळू शकणार नसेल तर त्याच्या जागी कोणाला संघात स्थान द्यायचे, याचा निर्णयही भारतीय संघाने केलेला आहे. गिलच्या पायाच्या पोटऱ्यांना दुखापत झाली असल्याचे समोर आले होते, पण जर गिलच्या पायाचे स्नायू दुखावले असतील तर ही दुखापत गंभीर असेल आणि त्याला बराच काळ क्रिकेटपासून लांब राहावे लागले. त्यामुळे जर गिल या दौऱ्यात खेळणार नसेल तर त्याच्याजागी अभिमन्यू इश्वरन या युवा खेळाडूला इंग्लंडला पाठवण्याचा विचार करण्यात आला आहे. गिलच्या दुखापतीबाबत स्पष्ट झाल्यावर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. भारतीय संघातील तीन खेळाडू गिलच्या जागी सलामीला येऊ शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ४ ऑगस्टपासून पहिल्या कसोटी सामन्याला नॉटिंगहॅम येथे सुरुवात होणार आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्यात खेळणे तरी सध्याच्या घडीला गिलसाठी कठिण दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गिलच्या जागी आता रोहित शर्माबरोबर सलामीला कोणाला पाठवायचे, याचा विचार आता कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. भारताकडे सध्याच्या घडीला हनुमा विहारीसारखा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. हनुमा भारतीय संघ पोहोचण्यापूर्वीच इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत होता. त्यामुळे तो चांगल्या लयीत आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात विहारीने दमदार कामगिरी करत भारताला पराभवापासून वंचित केले होते. त्याचबरोबर हनुमा सलामीलाही येऊ शकतो आणि तिसऱ्या क्रमांकावरही खेळू शकतो.त्याचबरोबर लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनाही गिलच्या जागी संघात संधी मिळू शकते. पण एक राखील सलामीवीर म्हणून गिल खेळणार नसेल तर इश्वरनला इंग्लंडला पाठवण्यात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता गिलच्या दुखापतीबाबत अंतिम निर्णय झाल्यावर नेमकं काय निर्णय घेतला जातोय, हे आपल्याला समजू शकेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TfRJOj
No comments:
Post a Comment