साऊदम्पटन : कसोटी सामना हा काही जणांना रटाळ वाटत असला तरी फायमलमध्ये एकाच क्षणात भारताचे चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होत आहे. फायनच्या सहाव्या दिवशी पहिले सत्र भारतासाठी धक्कादायक ठरले. कारण पहिल्या सत्रात भारताला तीन मोठे धक्के बसले. पण ज्यावेळी अजिंक्य रहाणे खेळत होता, तेव्हा एका क्षणात भारताचे चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्य फलंदाजी करत असताना भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. कारण अजिंक्यने चांगली सुरुवात केली होती. त्यावेळी मैदानातील भारताचे चाहते आनंदात होते. पण त्यानंतर एका क्षणात अजिंक्य बाद झाला आणि त्यानंतर या चाहत्याने डोक्यावर हात मारल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला हा व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अजिंक्य खेळत असताना भारताचा हा चाहता आनंदात होता. पण जेव्हा अजिंक्य बाद झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. त्याचबरोबर त्याने आपल्या कपाळावर हात मारून घेतल्याचे पाहायला मिळाले. सहावा दिवस हा भारतासाठी महत्वाचा होता, कारण त्यांच्याकडे आठ विकेट्स हातात होते. सहाव्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी २ बाद ६४ वरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. विराट कोहलीने काल ८ धावा केल्या होत्या. या धावसंख्येत त्याने पाच धावांची भर घातली आणि तो बाद झाला. काइल जेमिसनने त्याला बाद केले. पहिल्या डावात देखील काइलने त्याची विकेट घेतली होती. विराटच्या पाठोपाठ चेतेश्वर पुजारा देखील बाद झाला. पुजाराने कालच्या धावसंख्येत २ धावांची भर टाकली आणि काइलच्या चेंडूवर तो बाद झाला. पुजारा बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ७२ अशी झाली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणेही बाद झाला होता. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली खरी, पण त्यांना यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gWtj4b
No comments:
Post a Comment