साऊदम्पटन : फायनलचा आजच्या चौथ्या दिवशी भारतासाठी धोक्याची घंटा वाजेलली आहे. कारण सध्याची परिस्थिती पाहता भारताचा पराभवही होऊ शकतो, असे दिसत आहे. कारण भारताकडून काही चुका झाल्या असून संघाचा होऊ शकतो असे सध्याच्या घडीला दिसत आहे. सामन्याच्या सहाव्या दिवशी भारताला तीन मोठे धक्के बसलेले आहेत. कारण कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे बाद झाले आहेत. आता फक्त रिषभ पंत आणि तळाचे फलंदाज शिल्लक आहेत. त्याचबरोबर भारताकडे मोठी आघाडीही नाही. त्यामुळे न्यूझीलंडने भारतीय संघाचा दुसरा डाव लवकर आटोपला तर भारतीय संघाचा पराभव होऊ शकतो, हे आता समोर आले आहे. आता अखेरच्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होणार आहे. सहाव्या दिवशी सामना सुरू होण्यापूर्वी आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. यानुसार जर हवामानाने साथ दिली तर ९८ षटकांचा खेळ नक्की होईल. सामन्याचा अखेरचा तास तोपर्यंत सुरू होणार नाही जोपर्यंत ८३ षटके टाकली जाणार नाहीत. यासाठी गरज पडली तर वेळ वाढवली जाईल, पण कोणत्याही परिस्थितीत ९८ षटके खेळवली जातील. जर सामना टाय किंवा ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाणार आहे. भारतीय संघाची सहाव्या दिवसाच्या सुरुवातीला बिकट अवस्था झाली आहे. सहाव्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी २ बाद ६४ वरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. विराट कोहलीने काल ८ धावा केल्या होत्या. या धावसंख्येत त्याने पाच धावांची भर घातली आणि तो बाद झाला. काइल जेमिसनने त्याला बाद केले. पहिल्या डावात देखील काइलने त्याची विकेट घेतली होती. विराटच्या पाठोपाठ चेतेश्वर पुजारा देखील बाद झाला. पुजाराने कालच्या धावसंख्येत २ धावांची भर टाकली आणि काइलच्या चेंडूवर तो बाद झाला. पुजारा बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ७२ अशी झाली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणेही बाद झाला असून भारतीय संघ आता किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35I09R4
No comments:
Post a Comment