नवी दिल्ली: साउदम्प्टन येथे झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव करून जेतेपद मिळवले. या सामन्यात अनेकांना वाटले होते की भारताचा विजय होईल. पण अखेरच्या सहाव्या दिवशी न्यूझीलंडने बाजी मारली. वाचा- न्यूझीलंडच्या या शानदार विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार याने न्यूझीलंडची माफी मागितली आहे. त्याने आयसीसी सुरू होण्याआधी भारतीय संघ न्यूझीलंडचा सहज पराभव करेल असे म्हटले होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. वाचा- न्यूझीलंडमधील रेडिओ स्टेशन न्यूजटॉक झेबीशी बोलताना टीम पेन म्हणाला, आपल्या सर्वांनकडून कधी ना कधी चुका होतात. मी जो अंदाज व्यक्त केला होता तो चुकीचा ठरला. यासाठी मी मनापासून माफी मागतो. माझ्यामते न्यूझीलंडने खुप शानदार क्रिकेट खेळले. त्यांना क्रिकेट खेळताना पाहणे नेहमी छान वाटते. वाचा- साउदम्प्टन येथे १८ ते २३ जून या काळात झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या. उत्तरादाखल न्यूझीलंडने २४९ धावा करत ३२ धावांची आघाडी घेतली. भारताचा दुसरा डाव १७० धावात आटोपला आणि न्यूझीलंडने विजयासाठीचे १३९ धावांचे आव्हान दोन विकेटच्या बदल्यात पार केले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gXP0SE
No comments:
Post a Comment