साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडने ८ विकेटनी पराभव केला. दोन्ही डावात भारतीय संघ ऑलआउट झाला. भारताला पहिल्या डावात २१७ तर दुसऱ्या डावात १७० धावा करता आल्या. आघाडीचे पाच फलंदाज अपयशी ठरले. दुसऱ्या बाजूला केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. वाचा- फायनल सामन्यात न्यूझीलंड संघ प्रत्येक आघाडीवर पुढे होता. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला नसता तरच नवल कारण भारताची टॉप ऑर्डर कमकूवत होती. गेल्या एक वर्षातील कामगिरी पाहिली तर भारताचे आघाडीचे पाचही फलंदाज फ्लॉप ठरलेत. जगातील आघाडीच्या १० फलंदाजांमध्ये एकाही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही. या काळात फक्त रोहित शर्माने कसोटीत ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. वाचा- सलामीच्या जोडीने म्हणजे रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी १५ डावात एकत्र सुरुवात केली. या काळात दोघांना एकदाही १०० धावांची भागिदारी करता आली नाही. ७१ ही या दोघांची सर्वोत्तम भागिदारी आहे. जी या वर्षी सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली होती. रोहितने एका वर्षात ७ कसोटीत ५३८ धावा केल्यात. यात एका षटकाचा समावेश आहे. दुसरा सलामीवीर शुभमन गिलची कामगिरी विजय मिळून देण्याच्या योग्यतेची नाही. त्याने ८ कसोटीत ४१४ धावा केल्या आहेत. विदेशात त्याने ५ कोसटीत ५१.८०च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत. वाचा- कर्णधार विराट कोहली अजून धावा करण्यासाठी धडपडतोय. त्याने फायनलमध्ये ४४ आणि १३ धावा केल्या. गेल्या ५७१ दिवसांपासून कोणत्याही प्रकारात शतक केले नाही. वर्षभरात विराटने ६ कोसटीत ३०७ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतक आहेत ७४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. वाचा- भारतीय संघातील कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराची सरासरी ही सर्वात कमी आहे. त्याने १२ महिन्यात ९ कसोटीत २६.६८ च्या सरासरीने ४२७ धावा केल्या आहेत. ७७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. फायनलमध्ये पुजाराने ८ आणि १५ धावा केल्या. याचा फटका भारतीय संघाला बसला. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने गेल्या एका वर्षात परदेशात चांगली कामगिरी केली आहे. पण फायनलमध्ये तो अपयशी ठरला. चार कसोटीत त्याने १ शतकासह २६८ धावा केल्यात. फायनलमध्ये तो संघर्ष करत असल्याचे दिसले. पहिल्या डावात ४९ धावा करणाऱ्या अजिंक्यने जेव्हा गरज होती तेव्हा फक्त १५ धावा केल्या आणि बाद झाला. वाचा- सहाव्या क्रमांकावर येणारा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या वर्षभरात लयीमध्ये दिसला. त्याने ऑस्ट्रेलियातील गाबा कसोटीत नाबाद ८९ धावा केल्या होत्या. पंतच्या त्या खेळीमुळे भारत विजयी ठरला होता. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्याने ९१ धावा केल्या होत्या. फायनलमध्ये दुसऱ्या डावात बेजबाबदार शॉट खेळून तो बाद झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2U09L6U
No comments:
Post a Comment