Ads

Saturday, June 26, 2021

दादा कोंडकेंच्या गाण्यावर सूर्यकुमार यादवने केला कडक व्यायाम; पाहा व्हिडिओ

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय चाहते निराश झाले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघ आता ऑगस्ट महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान भारताचा दुसरा संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे आहे. भारताच्या या दुसऱ्या संघात अनेक युवा खेळाडूंचा भरणा आहे. वाचा- श्रीलंकेच्या दौऱ्याला जाण्याआधी सर्व खेळाडू मुंबईत एकत्र आले आहेत. या खेळाडूंचा क्वारंटाइन कालावधी सुरू आहे. संघात निवड झालेला मुंबईचा क्रिकेटपटू ( )चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सूर्यकुमार जीममध्ये व्यायाम करत आहे. व्यायाम करताना सूर्यकुमार दादा कोंडकेंचे एका हिट गाणे लावले आहे. वाचा- सूर्यकुमारने त्याच्या व्यायामाचा व्हिडिओ इस्टाग्रामवर शेअर केला असून त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर पुण्याचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने एकदम कडक अशी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा- वाचा- श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारतीय संघ प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. यासाठी २० जणांची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. पहिली वनडे १३ जुलै, दुसरी १६ तर तिसरी आणि अखेरची १९ जुलै रोजी होणार आहे. २२ जुलै पासून टी-२० मालिका होणार असून २४ ला दुसरी तर २७ जुलै रोजी तिसरी आणि अखेरची टी-२० लढत होईल. वाचा- असा आहे भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vZRe8j

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...