नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची लढत नुकतीच पार पडली. या लढतीत न्यूझीलंडने ८ विकेटनी पराभव केला. WTC फायनलनंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होईल. त्याच्या आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळाडूंच्या बाबत एक मोठा निर्णय घेऊ शकते. वाचा- WTCच्या लढतीनंतर आता पुढील सामन्याला एक महिन्यापेक्षा अधिक वेळ शिल्लक आहे. बीसीसीआयने याआधी केलेल्या नियोजनानुसार भारतीय संघातील खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी दिली जाणार होती. पण आता ही सुट्टी रद्द केली जाऊ शकते. वाचा- इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे बीसीसीआय खेळाडूंना मिळणारी ही सुट्टी रद्द करू शकते. बीसीसीआयच्या नियोजनानुसार २० दिवस खेळाडूंना बायो बबलमधून बाहेर फिरण्यास दिले जाणार होते. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय घेतला गेला नाही. वाचा- अरुण धूमल यांनी इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले की, आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. जशी परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. भारतीय खेळाडू इंग्लंडच्या दिर्घ दौऱ्यावर आहेत. त्यामुळे खेळाडूंना थोडा ब्रेक मिळावा आणि कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये फिरता यावे यासाठी हा निर्णय घेतला होता. वाचा- इंग्लंडमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून करोना झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या सर्व भारतीय खेळाडूंना करोनाची पहिली लस देण्यात आली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zTGP0R
No comments:
Post a Comment