नवी दिल्ली : भारताच्या श्रीलंकेच्या दौरा १३ जुलैपासून सुरु होणार आहे. पण हा दौरा सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे कर्णधार शिखर धवन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी ही गोष्ट चांगलीच पथ्यावर पडणार आहे. भारतासाठी कोणती आनंदाची बातमी आली आहे, पाहा...एकिकडे भारतीय संघ फायनलमध्ये पराभूत झाला, पण आता चाहत्यांना विजयाची आशा ही श्रीलंकेच्या दौऱ्यात आहे. हा दौरा अजून सुरुही झाला नाही आणि काही गोष्टी आता समोर आल्या आहेत. भारतीय संघ श्रीलंकेत आतापर्यंत १३ ट्वेन्टी-२० सामने खेळली आहे. या १३ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत ११ सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत, म्हणजेच भारतीय संघ श्रीलंकेत ८५ टक्के ट्वेन्टी-२० सामने जिंकला आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये झालेल्या एकूण ट्वेन्टी-२० सामन्यांचा विचार केला तर आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. या १९ सामन्यांपैकी भारतीय संघाने १३ सामने जिंकले आहेत, तर पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. यामधील एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यांतील विजयाची टक्केवारी पाहिली तर ती भारताच्या बाजूने आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाला आपल्याच देशात जास्त विजय मिळवता आलेले नाही. श्रीलंकेने आपल्याच देशात आतापर्यंत ४२ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. या ४२ सामन्यांमध्ये त्यांना फक्त १५ सामने जिंकता आले आहेत, तर २५ सामन्यांमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला आहे. तत्यामुळे श्रीलंकेची त्यांच्याच देशात आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली नाही, याचा फायदा भारतीय संघाला यावेळी नक्कीच होऊ शकतो. भारताचा पहिला वनडे सामना हा १३ जुलैला होणार आहे, त्यानतंर दुसरा वनडे सामना १६ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरचा आणि तिसरा वनडे सामना १८ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला २१ जुलैला सुरुवात होणार आहे. या दिवशी दोन्ही संघांत पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळवला जाणार आहे, त्यानंतर दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा २३ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना हा २५ जुलैला खेळवला जाईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jqnPBp
No comments:
Post a Comment