नवी दिल्ली: इंग्लंड दौऱ्यावर गेलेला श्रीलंकाचा क्रिकेट संघ मोठ्या वादात सापडला आहे. श्रीलंकेच्या संघातील दोघा खेळाडूंनी बाय बबलमधून बाहेर पडून करोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन क्रिकेटपटूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाचा- श्रीलंका संघाने काही दिवसांपूर्वी बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका देखील गमावली आहे. संघातील दोन खेळाडू आणि यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोघेही रस्त्यावर सिगारेट ओढताना दिसत आहेत. वाचा- इंग्लंडमधील डरहम येथे हे दोन्ही क्रिकेटपटू मास्क न घालता फिरत होते. ही घटना रविवारीची असून इंग्लंडने नुकत्याच झालेल्या ३ सामन्यांच्या टी-२० स्पर्धेत श्रीलंकला क्लीन स्वीप केला होता. या पराभवानंतर श्रीलंका संघावर खुप टीका केली जात आहे. अशातच या दोन क्रिकेटपटूंचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांकडून आणखी राग व्यक्त केला जात आहे. वाचा- संबंधित व्हिडिओ रविवारी रात्री ११.३० वाजता शुट करण्यात आला आहे. नजीर नावाच्या एका युझरने हा व्हिडिओ पोस्ट केलाय. डरहममध्ये मजा करताना काही ओळखीचे चेहरे. हे येते क्रिकेट खेळण्यासाठी आले नाहीत. मालिकेत पराभव झाल्यानंतर आणि निराश कामगिरी केल्यानंतर खेळाडू मजा करण्याची संधी सोडत नाही, असे नजीरने म्हटले आहे. वाचा- या दोन्ही क्रिकेटपटूंवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून कारवाई केली जाऊ शकते. त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. ते फक्त सरावासाठी हॉटेलच्या बाहेर जाऊ शकत होते. दरम्यान श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. व्हिडिओतील गोष्टींमध्ये तथ्य आढळले तर दोघांवर कारवाी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UbB8uP
No comments:
Post a Comment