नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला असला तरी आकडेवारी पाहता आज देखील विराटचा समावेश जगातील सर्वात महान कर्णधारांमध्ये होते. देशाला आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवणाऱ्या महेंद्र सिंह धोनीपेक्षा अनेक बाबतीत विराट पुढे असल्याचे दिसते. असे असेल तरी विराटला अद्याप आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळाले नाही. कर्णधार म्हणून विराट कोहलीसाठी पुढील सहा महिने अग्नीपरीक्षे सारखे असणार आहेत. सर्वोत्तम कर्णधार म्हणून विराटला काही स्पर्धा आणि मालिका जिंकाव्या लागतील. यातील ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधी विराटसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. यात विराट दोन कसोटी मालिका आणि एक आयपीएल आणि खेळणार आहे. यामुळे विराटसाठी हा कालावधी अग्नीपरीक्षासारखा असणार आहे. वाचा- विराटने आतापर्यंत आयसीसीच्या तीन स्पर्धेत नेतृत्व केले आहे. पण त्याला विजेतेपद मिळवता आले नाही. इतक नव्हे तर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार असलेल्या विराटला अद्याप विजय मिळवात आला नाही. विराटपुढे पहिले आव्हान असेल ते इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे, त्यानंतर भारतात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. पुढील सहा महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत विराट अपयशी ठरला तर कर्णधार म्हणून अन्य खेळाडूचा विचार केला जाऊ शकतो. WTC फायनलमध्ये पराभव झालेल्या भारतीय संघाला आता इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील विजयासह भारत दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात विजयाने करू शकतो. गेल्या वेळी प्रमाणे या वेळी देखील WTCची सुरुवात विजयाने करण्याची विराटची इच्छा असेल. पण इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून भारताला मोठा कालावधी झालाय. वाचा- इंग्लंडविरुद्धची मालिका झाल्यानंतर विराटसमोर आयपीएलचे आव्हान असेल. २०१३ साली विराटकडे RCBचे नेतृत्व दिल्यानंतर आतापर्यंत त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही. या उटल रोहित शर्माने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. आयपीएलनंतर भारत टी-२० वर्ल्डकप खेळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमधये होणाऱ्या या स्पर्धेत विराट पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी प्रयत्न करेल. जर या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात तो अपयशी ठरला तर मर्यादीत षटकाच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. वाचा- टी-२० वर्ल्डकपनंतर मायदेशात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत भारताला न्यूझीलंडवर विजय मिळवून WTCमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाल्यास कसोटी संघाचे नेतृत्व विराटकडून अजिंक्य रहाणेकडे जाऊ शकते. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारताचा एकाही कसोटीत पराभव झालेला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ddWWgk
No comments:
Post a Comment