नवी दिल्ली : क्रिकेट विश्वासाठी आता एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कारण जो खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी सापडला होता. या भयंकर चुकीमुळे त्याला जेलमध्येही जायला लागले होते, तो खेळाडू आता क्रिकेटच्या मैदानात पंच म्हणून समोर येऊ शकतो. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानातील भयानक वास्तव आता पुन्हा एकदा समोर आले आहे. नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या....क्रिकेट विश्वात २०१० साली स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण घडले होते. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार असलेला सलमान बट या प्रकणात दोषी आढळला होता. त्यामुळे मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली त्याला जेलमध्येही जावे लागले होते. त्याचबरोबर त्याच्यावर १० वर्षांची बंदीही घालण्यात आली होती. पण आता सलमान बट भविष्यात मैदानात पंच म्हणून काम करताना दिसू शकतो. कारण पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने पंचगिरीच्या ऑनलाईन कोर्स सुरु केला आहे, त्यामध्ये सलमान बटने प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे हा कोर्स पास झाल्यावर सलमान भविष्यात मैदानात पंचगिरी करू शकतो. पण या गोष्टीचा धक्का आता चाहत्यांना बसला आहे. कारण जो खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळतो तो पंच कसा काय बनू शकतो, असा सवाल चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. कारण पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असताना कर्णधार सलमान बटच्या सांगण्यावरूनच वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर यांनी नो बॉल फेकला होता. या सर्व प्रकरणामुळे पाकिस्तानात मोठा भुकंप आला होता. त्याचबरोबर क्रिकेट विश्वासाठी ही सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट होती. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने ७ ते २५ जून या कालावधीमध्ये ऑनलाईन पंचांच्या कोर्सचे आयोजन केले होते, यामध्ये ३४६ जणांनी सहभाग घेतला होता. या ३४६ जणांमध्ये ४६ क्रिकेटपटूंचाही समावेश होता. या कोर्सचा निकाल काही दिवसांमध्येच जाहीर होणार आहे, त्यामुळे आता सलमान बट पंच बनणार की नाही, हे काहीच दिवसात आता समोर येणार असल्याचे दिसत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hfUozs
No comments:
Post a Comment