मुंबई: न्यूझीलंडकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा झालेल्या पराभवानंतर चाहत्यांमध्ये मोठी नाराजी आहे. ही नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त केली जात आहे. बुधवारी न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच मागणी सुरू झाली. वाचा- अखेरच्या सत्रात न्यूझीलंडला विजयासाठी १२० धावांची गरज असताना सोशल मीडियावर भारताचे मुख्य प्रशिक्षक याचे नाव चर्चे आले. अनेकांनी त्यांना हटवून राहुल द्रविडला संघाचे कोच करण्याची मागणी सुरू केली. जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्या शिखर धवनच्या नेतृत्वाखाली संघाचे कोच म्हणून द्रविड असणार आहे. भारताच्या या दौऱ्यावर सर्व चाहत्यांची नजर असेल. जर हा दौरा यशस्वी ठरला तर द्रविडला कोच करण्याची मागणी आणखी वाढेल. वाचा- भारताच्या पराभवानंतर काही चाहत्यांनी कर्णधार बदलण्याची मागणी केली. विराटच्या जागी रोहित शर्माला कर्णधार करा असे अनेकांनी म्हटले. विराटच्या ऐवजी रोहितला कर्णधार करा ही मागणी नवी नाही. आयपीएल दरम्यान नेहमी याची चर्चा होते. वाचा- विराटकडे कसोटीचे कर्णधारपद तर रोहितला वनडे आणि टी-२०चे नेतृत्व दिले जावे असे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. भारताचा न्यूझीलंकडून झालेल्या पराभवानंतर आता पुढील काही दिवस ही चर्चा सुरूच राहील. भारतीय चाहत्यांची ही नाराजी आणि राग इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयाने शांत होऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SZNtlC
No comments:
Post a Comment