साऊदम्पटन : फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला पराभूत करत त्यांना जबरदस्त धक्का दिला. पण आता न्यूझीलंडनंतर इंग्लंडनेही भारतीय संघाला धक्का दिला आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. पण ही कसोटी मालिका खेळण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. फायनलमधील पराभवानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याबाबत एक मोठी बातमी आता आली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आता एक गोष्ट करावी लागणार आहे. फायनलपूर्वी जी चुक भारतीय संघाकडून घडली होती, ती सुधारण्यासाठी आता त्यांना संधी मिळणार नसल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय संघाचे कसोटी मालिकेत काय होणार, याची चिंता आतापासून चाहत्यांना लागलेली आहे. फायनलपूर्वी भारतीय संघाला सराव सामना खेळता आला नव्हता. त्यामुळे त्यांची योग्य तयारी होऊ शकली नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला सराव सामना खेळायला मिळाला, अशी मागणी बीसीसीआयने इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला केली होती. पण इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आता ही मागणी आम्ही पूर्ण करु शकत नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे बीसीसीआयसह भारतीय संघालाही हा एक मोठा धक्का असेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, " इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला १-२ सराव सामने खेळायला मिळावेत, अशी मागणी बीसीसीआयने इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला केली होती. पण इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने ही मागणी मान्य केली नाही. सध्याच्या घडीला सुरक्षेबाबत इंग्लंडचे क्रिकेट मंडळ कडक पावले उचलत आहेत. जर सराव सामना खेळवायचा असेल तर कौंटी क्रिकेटमधील एका संघाला क्वारंटाइन करावे लागेल, त्यांच्या चाचण्या कराव्या लागतील. त्याचबरोबर बायो-बबलची व्यवस्थाही करावी लागेल. त्यामुळे ही गोष्ट सध्याच्या घडीला तरी शक्य नसल्याचे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3deYzu1
No comments:
Post a Comment