लंडन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत झाली होती. साउदम्प्टन येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला आणि विजेतेपद मिळवले. या विजेतेपदानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केनने फायनल सामन्याबद्दल त्याचे मत व्यक्त केले. वाचा- WTC फायनलबद्दल बोलताना केन म्हणाला, एका कसोटी सामन्यामुळे रोमांच निर्माण होते. पण त्यामुळे पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ किती मजबूत आहे. पावसामुळे फायनल सामन्यातील दोन दिवस वाया गेले होते. आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला होता. त्या दिवशी सामन्याचा निकाल लागला. भारताने दिलेले विजयासाठीचे १३९ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने सहज पार केले. वाचा- आम्हाला कल्पना आहे की भारत एक मजबूत संघ आहे. तो एक महान संघ आहे. आम्हाला या सामन्यात विजय मिळवल्याबद्दल गर्व आहे. पण यामुळे हे सिद्ध होत नाही की ते (भारतीय संघ) किती मजबूत आहेत आणि त्याच्यात काय कौशल्य आहे, असे केन म्हणाला. वाचा- यात कोणतीही शंका आही की ते अधिक सामने जिंकतील. तुम्हाला त्यांच्या गुणवत्तेबद्दल माहिती आहे. त्याच्याकडे वेगवान आक्रमक गोलंदाजांचा ताफा आहे, जो जगात सर्वोत्तम आहे. फिरकी गोलंदाजी अविश्वसनीय आहे. फलंदाजीचा तर उल्लेख करण्याची गरज नाही. वाचा- भारतीय खेळाडू हे खेळाचे महान दुत आहेत. राष्ट्रीय संघासाठी त्यांच्याकडे जी ऊर्जा आहे ती मला आवडते. ते देशाकडून खेळण्यासाठी अशी भावना निर्माण करतात यामुळे आम्ही सर्व भारताचे कौतुक करतो. त्यांची खेळासाठीची भावना इतकी उत्कट असते की ते स्वत:ला खेळाचे दुत म्हणून पाहता, अशा शब्दात केनने भारतीय खेळाडूंचे कौतुक केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UFqE7i
No comments:
Post a Comment