मुंबई: भारताचा क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया प्रत्येकी तीन वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड असणार आहेत. वाचा- संघाच्या या दौऱ्यातील खास गोष्ट अशी की, भारताचे दोन संघ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर क्रिकेट खेळत असतील. एका बाजूला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू असेल तर दुसऱ्या बाजूला शिखर धवनच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या संघ श्रीलंका दौऱ्यावर असेल. विराटच्या नेतृत्वाखाली चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. वाचा- याआधी कधी झाले होते भारतीय क्रिकेट संघाचे दोन संघ खेळण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी १९९८ साली मलेशियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात टोरंटो येथे पाच सामन्यांची वनडे मालिका सुरु होती. अशा स्थितीत बीसीसीआयने दोन संघ तयार केले होते. वाचा- पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अजय जडेजाच्या नेतृत्वाखाली संघ तयार करण्यात आला होता. अर्थात आयसीसीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या क्रिकेट सामन्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता दिली नव्हती. या लढतीचा समावेश लिस्ट ए मध्ये करण्यात आला होता. पण यावेळी मात्र भारताचे दोन्ही संघ अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहेत. तेव्हा दोन्ही संघांचा... १९९८ साली जेव्हा भारताचे दोन संघ खेळत होते, तेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या संघात सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण सारख्या खेळाडूंचा समावेश होता. हा संघ ग्रुप फेरीतच बाद झाला. त्यांना फक्त कॅनडाविरुद्ध विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. वाचा- दुसऱ्या बाजूला सौरव गांगुली, राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद सारख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचा पाकिस्तानने ४-१ने पराभव केला. मालिकेच्या अखेरच्या सामन्यात सचिनने ७७ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3haYiJF
No comments:
Post a Comment